Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा.तहसील समोर मुंडन व ठिय्या आंदोलन , गौरवकुमार इंगळे

संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी चे प्रमुख गौरवकुमार इंगळे ची मागणी.
मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते गौरव कुमार इंगळे संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी च्या वतीने आज दिनांक 3 जुलै रोजी एक दिवशीय ठिय्या आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनाला   इरफान शेख शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुमित मुढरे, संभाजी ब्रिगेडचे रमेश मुंजे, अजय गवार गुरू,हरीश गव्हाणे शिवाजी गजभार यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला असून या 
उपोषणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जुबेर मोहनावाले, अर्जुन पाटील सुर्वे ,सुबोध साठे व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या आंदोलनाला येऊन आपला पाठिंबा दर्शवला. येथील ग्रामीण रुग्णालयाची व्यथा ही सर्वांना माहीत आहे या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करून उपजिल्हा रुग्णालय झाले पाहिजे या रास्त मागणीला शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने आम्ही एक दिवसीय  आंदोलन करीत असल्याचे प्रतिपादन आंदोलकांनी केले.
 सदर आंदोलना मध्ये मुंडन करून शासनाच्या प्रशासनाच्या उदासीन धोरणाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments