Ticker

6/recent/ticker-posts

जनआक्रोश मोर्चाद्वारे संविधान वादी व मानवतावादी संघटनांची तीव्र निदर्शने

वाशी, नवी मुंबई. 
(वार्ताहर ) अनंतराज गायकवाड

 

         27 जुलै रोजी हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या नुसार गरज असल्यास घराबाहेर पडा असे असताना देखील भर पावसात महिला संघटनांनी मानवतेला काळीमा फासणाऱ्या मणिपूर अत्याचार घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 
      
     प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला विकास सामाजिक संस्था यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन केंद्र सरकारचा आणि मणिपूर सरकारचा घोषणाबाजी करून जाहीर निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी केला.
 
          या आंदोलनामध्ये सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थेच्या गीताताई चापके, माधवी सूर्यवंशी, मीना शेळके, मयुरी मोरे, पार्वती दाभाडे, सुनीता शेंडगे, अनुसया कांबळे, शबाना खान, मनीषा खैरे, संतोष शिरवले,  जनशक्ती संघटनेच्या विनिता बर्फे व आनंद स्वरूप फाउंडेशन संघटनेच्या वैशाली घोरपडे, ज्येष्ठ विचारवंत मा. सिद्धार्थ जाधव, संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ मारुती खुटवड, बसपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश जयस्वाल, ऑल इंडिया पॅंथरचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दीपक वंजारी, भीम आर्मीचे प्रकाश पाईकराव. मुंबई प्रदेश भीम आर्मीचे अध्यक्ष अविनाश गरुड, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाईकराव, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय माळी, दत्ताजी गायकवाड रिपाई आठवले गटाचे ज्येष्ठ नेते रमेश बोदडे, सविधान वादी नेते प्रल्हाद गवारी, प्रा. गुलाबराव आराख, सचिन वाघ, सुनिता सपकाळे, खन्ना मॅडम, दादा लादे, मानवाधिकार संघटनेचे राजकुमार चंदन, डॅनी डिसूजा, सुयोग बोलोसे, आगरी कोळी एकता महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाटील, शेकापचे नवी मुंबई अध्यक्ष संतलाल शर्मा, आझाद समाज पार्टीच्य नेहा ताई शिंदे व मानवतावादी लोकांनी सहभाग घेतला. 

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित पॅंथरचे पत्रकार सुनील गायकवाड यांनी केले. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

Post a Comment

0 Comments