वाशिम - जिल्ह्यात सातवी अतिवृष्टी झाली असून सर्वत्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ह्या नैसर्गीक आपत्तीमुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार, २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन पुकारण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात २८ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाला मनसेच्या जिल्हयातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्यासह शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिनेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, तालुका संघटक रघुनाथ खूपसे, मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन कुटे, शहर संघटक प्रतीक कांबळे, शहराध्यक्ष गणेश इंगोले, शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव, विजय नाईकवाडे, वाहतूक सेनेचे विनोद सावके, मालेगाव तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण वानखेडे, रिसोड तालुका सचिव धनीराम बाजड, विद्यार्थी सेनेचे युवा नेतृत्व मोहन कोल्हे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष यश चव्हाण, श्री देशमुख, पुष्पा रौंदळे, कैलास रौंदळे, शाखाध्यक्ष पंडित लबडे, शाखा उपाध्यक्ष दत्ता बुंधे, शाखा संघटक गजानन आढाव, शाखा सचिव सचिन लबडे, धम्मपाल लबडे, सोहम कालापाड, मोहन लबडे, अजय लबडे, पंडीत लबडे, मनोहर चव्हाण, आकाश आंबेकर आदींनी केले आहे.
0 Comments