Ticker

6/recent/ticker-posts

समीर वानखेडेंनी सीबीआयलाच आणले अडचणीत; वाचा सविस्तर....

----------------------------------------------
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे         संपादक सुधाकर चौधरी

शाहरूख खानचा मुलगा आर्यन याच्याशी संबंधित अमली पदार्थ प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयलाच कोंडीत पकडले आहे. आपल्या विरोधात खटला चालवण्यासाठी सीबीआयने जी परवानगी घेतली ती वैध नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
न्यायालयात वानखेडे यांची बाजू
मांडताना त्यांचे वकील आबाद पोंडा
म्हणाले की वानखेडेंच्या खटल्याची परवानगी केंद्रीय तपास संस्थेने गृहमंत्रालयाकडून घेतली आहे. मात्र वानखेडे हे भारतीय राजस्व सेवेतील अर्थात आयआरएस अधिकारी आहेत. ते अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित काम करतात.
त्यांना केवळ गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एनसीबीत पाठवण्यात आले होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17 ए नुसार कोणत्याही सरकारी
अधिकाऱ्याची चौकशी करण्यापूर्वी
परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानुसार सीबीआयने गृहमंत्रालयाची परवानगी घेतली होती, मात्र त्यालाच वानखेडेंकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments