Ticker

6/recent/ticker-posts

ॲल्युमिनियम तारांच्या चोरांविरोधात पोलीसांची धडक कारवाई : आरोपीसह 2.70,000/- रू. चा मुद्देमाल जप्त


महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी अंतर्गत विद्युत प्रवाहाकरीता वापरण्यात येणा-या ॲल्युमिनियम तारांची चोरी करणा-यांविरोधात पो.स्टे.ला दाखल गुन्हयाचा उलगडा मा.पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी करण्यात येत असुन गुन्हे उघडकिस आणून चोरांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत.

दिनांक 04/07/2023 रोजी फिर्यादी नामे शहबाज गोरमिया काजी वय 30 वर्षे व्यवसाय नोकरी (ज्यु इंजिनयर) म.रा.वि.वि.के. मर्या. शाखा मालेगाव जि.वाशिम रा.गुलशन नगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ हनु अकोला फाटा, मालेगाव ता. मालेगाव जि.वाशिम यांचे फिर्यादवरून दि.02/07/2023 से 22.00 वा. ते दि. 03/07/2023 चे 16.00 वा. दरम्यान 11 के. व्ही. अमानी ते बोरगाव एजी विद्युत वाहीनी येथील विद्युत तारा बोरीस गेलेल्या आहेत. त्यावरून पो.स्टे. मालेगाव येथे अग.क.305 / 23 कलम 136 विज अधिनियम 2003: अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हा उघडकिस आणण्याकरीता पो.स्टे. तरावरील टाउन बिट मधील अधिकारी व अंमलदार हे

आरोपीचे शोधकामी प्रयत्न करीत असताना दि 30/07/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. की, पातुर जि.अकोला येथून एक टाटा एस कंपनीचे वाहन कएम.एच 37 बी 1603 मध्ये तिन ईसम विद्युत प्रवाहाकरीता वापरण्यात येणारे अॅल्युमिनियम तारांचे बंडल घेवून वाशिमकडे येत आहेत. अशा बातमीवरून अकोला ते वाशिम जाणा-या रोडवर रिधोरा फाटा येथे सापळा लावून सदरचे वाहन ताब्यात घेतले असता सदर वाहनामध्ये विद्युत प्रवाहाकरीता वापरण्यात येणारे ॲल्युमिनियमचे तारांचे एकूण 05 नग ज्याचे वजन 500 कि.ग्रॅ. कि. 1. 70,000/- रू. तसेच एक टाटा एस कंपनीचे वाहन क. एम.एच 37 बी 1603 किं. 2,00,000/- एस. असा एकूण 2.70,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे १) शाहरूख खान कादरखान वय 22 वर्षे रा. काटा ता.जि.वाशिम 2) आरीफ मलिक सिराजउददीन वय 23 वर्षे 3) सोहेल मलिक सिराजउददीन वय 19 वर्षे दोन्ही रा.गोटे कॉलेजजवळ बिलाल कॉलनी वाशिम मुळ पत्ता रा.फतेपुर जि.मेरठ उत्तरप्रदेश यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदर आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता 03 दिवस पोलीस कोठडी मिळाल्याने सदर आरोपीतांकडून आणखी अशाप्रकारचे गुन्हे उघडकिस। येण्याची शक्यता आहे. • सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे,

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनात स्थागुशा. वाशिम पो. नि. रामकृष्ण महल्ले, पो.स्टे, मालेगाव ठाणेदार श्री. दत्तात्रय आव्हाळे, सपोनि संतोष इंगळे, पोउपनि राहुल गंधे, सपोउपनि ज्ञानेश्वर राठोड, रवि संवार, नारायण चंदनशिव, पोहेको कैलास कोकाटे, नापोकों राजाराम कालापाड. शिवानी काळं चापोना विजय डोईफोडे, पोकों अमोल पवार, जयशंकर पाटील, ज्ञानदेव मात्रे यांनी केली. चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरीता वाशिम पोलीस दल सतर्क असुन नागरिकांनीही याबाबत पोलीस स्टेशन मालेगाव (संपर्क क्र. 07254-271253) DIAL 112 किंवा संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दयावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments