श्री धानोरकर आधुनिक ग्रामजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, धानोरा (खु.) ता. मंगरूळपीर जि. वाशिम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा (खु.) येथील
आकर्षक रंगसंगतीने रंगविलेली शाळेच्या इमारती, प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळी आणि शाळेतील सगळे फलक सुस्वागतम, शुभस्वागतम या शब्दाने आकर्षक रित्या सजविलेले.
या प्रसंगी शैक्षणिक सत्र 2023-24च्या प्रथम दिनी विद्यालयामध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य चे वाटप करण्यात आले
उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी नवोगतांचं स्वागत
विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेशभाऊ धानोरकर, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष बाबारावजी धानोरकर विद्यालयाच्या शिक्षिका आदरणीय सौ. धानोरकर मॅडम, सौ. चौधरी मॅडम, वैभव पाटील, सावके , उचित , परसराम धानोरकर ,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तथा समस्त सहकारी वृंद यांनी उपस्थित राहून गुलाब पुष्प देऊन स्वागत करून नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा दिल्या
0 Comments