नांदखेडा ता.मंगरुळपीर येथील मुस्लीम बांधवांनी एकादशी निमित्त कुर्बानी न देता सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.
आज आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी आले. वारकरी संप्रदायासाठी आषाढी एकादशी हा पविञ उत्सव तर मुस्लिम समाजासाठी बकरी ईद हा पविञ सण, या दिवशी कुर्बानी दिल्या जाते. परंतु गावात वारकरी संप्रदायाची मंडळी आहे. त्यांना एकादशीचा उपवास आहे. याचा मुस्लिम समाजबांधवांनी विचार करुन स्वयंस्फुर्तीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. व वारकरी
संप्रदायाविषयी सदभावना जोपासली.
ज्ञानोबा, तुकोबा व वारकरी परंपरेतील संतांनी मानवधर्म आपल्या संत साहित्यातुन सांगीतला. त्याची प्रचिती आज नांदखेडा गावात दिसुन आली.
याचेच औचित्य साधुन पांडुरंग जायभाये व इतर मंडळींनी वारकरी संप्रदाय , सर्वधर्मसमभाव मिञमंडळ नांदखेडाचे वतीने मुस्लिम बांधवांचा शाल,श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत केले व ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
या निमित्त मुस्लिम बांधव , वारकरी मंडळी व सर्वधर्मसमभाव मिञ मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments