मंगरुलपीर समितीच्या सभागृहामध्ये तालुक्यातील जि.प. व म.प.च्या शाळेच्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या शाळापूर्वतयारी व शैक्षणिक आढावा विषयाच्या अनुषंगाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेची सुरुवात विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रेखाताई भगत, प्रमुख मार्गदर्शकांमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथ) राजेन्द्र शिंदी, शिक्षणाधिकारी माध्य. (योजना) गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी (प्राथ) सविता अतकरे उपस्थित होते. विचारपीठावर समग्र शिक्षा अभियानाचे कार्यक्रम अधिकारी दिनेश बोलके, श्री. भालेराव, भी. बनसोड साहेब उपस्थित होते , विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल याबद्दल
शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजेन्द्र शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव यांनी NILP नवभारत साक्षरता प्रोग्राम कसा राबवावा याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले पंचायत समिती सभापती रेखाताई भगत यांनी नवीन शैक्षणिक सत्राकरिता सर्वाना शुभेच्छा दिल्या
सभेकरिता सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते सभा यशस्वी करण्याकरिता बी आर सी टीम, सर्व विषयतज्ञ
व विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले विद्यापति नवोदय परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांचा 1 सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता अतकरे (गटशिक्षणाधिकारी यांनी केले. तर सूचसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला गोंदेवार यांनी व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी गजानन शिंदे योनी केले.
0 Comments