अलीकडील काळात जास्तीत जास्त नागरिक व्यसनांच्या आहारी जात असून व्यसनांपायी कर्जबाजारीपणा, नैराश्याच्या गर्तेत ढकलल्या जात आहेत. त्यातूनच गुन्हेगारीचे प्रमाण वाढते व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे समाजातील युवकांच्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
त्याच पार्श्वभूमीवर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचीत्यावर वाशिम पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी कार्यशाळा, नागरिकांशी परिसंवाद, रॅली व पथनाट्याद्वारे अंमली पदार्थ सेवनाचे व व्यसनांचे दुष्परिणाम तसेच त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये पो.स्टे.मालेगाव हद्दीतील बस स्थानक परिसरात, पो.स्टे.शिरपूर येथे चालक, विद्यार्थी व नागरिकांसोबत, पो.स्टे.आसेगाव हद्दीतील ग्रामपंचायत कार्यालय येथे व पो.स्टे.धनज हद्दीतील कामरगाव येथे वाहन चालक व नागरिकांशी परिसंवाद साधत जनजागृती करण्यात आली. वाशिम शहरातील नॅझरीन नर्सिंग कॉलेज तसेच IUDP कॉलनी येथील अभ्यासिकेत, रिसोड शहरातील भारत माध्यमिक शाळा, अनसिंग येथील ज्ञानसागर कॉलेज येथे, पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीतील ग्राम खेर्डा येथील फार्मसी कॉलेज येथे, पो.स्टे.मानोरा हद्दीतील पंचायत समिती सभागृहात संत वामन महाराज व्यसनमुक्ती केंद्र, मानोरा यांच्या समन्वयातून व वाशिम शहरातील आर.ए.कॉलेज येथे कार्यशाळा व रॅली काढत व्यसनमुक्तीचा जागर करण्यात आला. पो.स्टे.रिसोड हद्दीतील कृषी महाविद्यालय, करडा येथे पथनाट्यद्वारे अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्तीचे आवाहन करण्यात आले.
नागरिकांनी व्यसनांच्या आहारी न जाता अंमली पदार्थांचे सेवन करणे टाळावे व स्वतःचे आयुष्य निर्व्यसनी राहून निरोगी राखावे तसेच अंमली पदार्थ विक्री किंवा साठवणूक संबंधाने काही माहिती असल्यास तात्काळ Dial 112 वर किंवा संबंधित पोलीस अधिकारी/अंमलदार यांना माहिती द्यावी, त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
*(जनसंपर्क अधिकारी)*
पोलीस अधिक्षक कार्यालय,
वाशिम यांचेकरिता
0 Comments