मंगरूळनाथ/ प्रतिनिधी :-
कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव मुजिफ खांन पठाण यांची दिवान साहेब दर्गा भेटी दरम्यान नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार सुधाकर आडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनस अहेमद,बबलु खान,शरद पती, पत्रकार बाळासाहेब काळे,शेख इरफान शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक,यांची उपस्थिती होती, कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव मुजिफ खांन पठाण हे मंगरूळपिर येथील श्रद्धा स्थान दिवान साहेब बाबा दर्गा येथे नेहमी येतात, दिनांक २९ जुन रोजी बकरी ईदच्या पुर्वार्धावर येथील ठाणेदार सुधाकर आडे हे नमाज अदा करण्याच्या स्थळाची म्हणजेच ईदगाह ची पाहणी करण्यासाठी आले असता,दिवान साहेब बाबा संस्थानच्या वतीने व कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव मुजिफ खांन पठाण यांनी पोलिस कर्मचाऱ्या समवेत नवनियुक्त ठाणेदार व इतरांचा सन्मान करण्यात आला जे चांगले कार्य करतात त्यांचा नेहमीच सन्मान होत असतो
0 Comments