Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये नवीन ‘Belgian Malinois’ श्वान ‘अनिका’ दाखल

नुकतेच बॉम्ब शोधक व नाशक पथक, वाशिम मध्ये एक नवीन Belgian Malinois या ब्रीडचा श्वान खरेदी करण्यात आला असून सदर श्वान हा अत्यंत चपळ आणि हुशार असून त्याची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत चांगली आहे. सदर श्वान हा सकारात्मक मजबुतीकरण आणि सातत्यपूर्ण सूचनांना चांगला प्रतिसाद देतो. या नवीन श्वानामुळे बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी सदर श्वानाचे नामकरण ‘अनिका’ असे केले आहे. आगामी काळात श्वान ‘अनिका’ सुद्धा वाशिम जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोलाची भूमिका पार पाडणार आहे.
     सन २०२३ या वर्षामध्ये बॉम्बशोधक व नाशक पथक, वाशिम यांच्याकडून एकूण १९ व्हीव्हीआयपी/व्हीआयपी दौरे कार्यक्रम तपासणी, ४७ वेळा बसस्थानके व रेल्वे स्थानके तपासण्या, १२ मर्म स्थळे, ७८ गर्दीच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासण्या करण्यात आल्या असून वेळोवेळी  जिल्ह्यात झालेल्या मॉक ड्रील मध्ये सहभाग घेतला आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून जिल्ह्यात वेळोवेळी महत्वाचे ठिकाणांची कसून घातपातविरोधी तपासणी करण्यात येत असल्याने संशयित वस्तू आढळल्यास अगोदरच निष्क्रिय करण्यात येते व पुढील धोका टाळण्यात येतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवित्वाचे व मालमत्तेचे रक्षण होऊन लोकांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागते.
     मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.प्रवीण सुळे, सपोउपनी.एच.जी.चौधरी, पोहवा.एस.आर.सुपारे, नापोकॉ.डी.एस.पवार, ए.एन.घाटोळे, पोकॉ.जी.व्ही.मुंडे, डी.टी.ढोके, के.बी.मस्के, ए.एन.घाटोळे, एस.बी.अंभोरे, एस.व्ही.वाटाणे, के.पी.डौलसे, जी.डी.भिसे, पी.के.सबरदांडे हे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्टेफी, प्रिन्स व आता नव्याने दाखल झालेले श्वान ‘अनिका’ हे श्वान बॉम्ब शोधक व नाशक पथक वाशिम येथे कामगिरी बजावत आहेत.


     ( जनसंपर्क अधिकारी )
पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम.

Post a Comment

0 Comments