Ticker

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा येथे उन्हाळी शिबिराचे उद्घाटन संपन्न


 मंगरूळपिर
 
स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा  येथे  विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, शैक्षणिक कौशल्य वाढविण्याच्या हेतूने,  अभ्यासपूरक, जीवन उपयोगी विविध कला, क्रीडा  व कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने  दिनांक ११ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीमध्ये भव्य स्वरूपात नि:शुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे मंगळवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते  रीतसर उद्घाटन पार पडले.
 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.पी. कासलीकर यांनी भूषविले होते तर प्रमुख अतिथी म्हणून  आदर्श ग्राम वनाेजा येथील सरपंच डॉ. श्रीरामजी मूखमाले,  तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वरराव राऊत, सुरेश पाटील राऊत,  गंगादीप राऊत, गजानन राऊत, गोवर्धन राऊत, सचिन राणे,  माणिक बायस्कार, पवन राऊत,  जिल्हा परिषद  शाळेचे मुख्याध्यापक गावंडे सर, वानखेडे सर, डी के भगत,  एस पी नारळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेश पाटील राऊत यांनी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनावलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार होणे किती महत्त्वाचे आहे. हे आपल्या मनोगतातून मांडले.  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर पी कासलीकर यांनी  मान्यवरांना  या उन्हाळी शिबिराचा उद्देश  व घेण्यात येणारे उपक्रम या विषयी माहिती दिली.
 
या कार्यक्रमाचे संचालन डी एन सांगळे यांनी केले. तर  मान्यवरांचे आभार डी पी डेरे यांनी मानले. या कार्यक्रमाला एस आर राठोड, के व्ही घुगे, आर एस घुगे, एन व्ही देशमुख, डब्ल्यू अवचार, आर. ए. चपटे, एस व्ही झळके, बी एस सोनटक्के, सुशील मनवर, हमीद बाबूजी, निवास घुगे, शिवाजी आंधळे, देवराव राठोड आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यालयातील वर्ग ५ ते १२ चे  तसेच परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments