Ticker

6/recent/ticker-posts

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित”, शेतकऱ्यांना दिलासा

राज्य सरकारने “सततचा पाऊस” ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे.
राज्य सरकारने “सततचा पाऊस” ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे सततच्या पावसामुळे शेतीपिकांचं होणाऱ्या नुकसानीसाठी मदत देण्यात येणार आहे, आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासांत ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास जेवढ्या क्षेत्राचं नुकसान झालं आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
पण महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळेदेखील शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. अशावेळी शेतकऱ्यांना मदत मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे.

यापुढे राज्य शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या “अतिवृष्टी” या नैसर्गिक आपत्तीकरिता देखील २४ तासामध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून याबरोबरच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ट्रीगरमधील “सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI)” हा अतिरिक्त निकष शेती पिकांच्या नुकसानीकरिता लागू करण्यात येणार आहे. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी देखील हा निकष लागू राहील.

Post a Comment

0 Comments