मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात कला विभागाद्वारे पोस्टर प्रेसेंटेशनचे आयोजन दिनांक 1 एप्रिल 2023 शनिवार रोजी करण्यात आलें.या उपक्रमामध्ये कला विभागाचे सर्व विषयांचे प्राध्यापकांचा समावेश होता. या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या हस्ते हित कापून उद्घाटन करण्यात आले .यावेळी डॉ. कान्हेरकर सर यांनी अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांबद्दल जनजागृती निर्माण होते असे प्रतिपादन केले.
या पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला यात विविध विषयांवर जसे कुपोषण, कुपोषणाची कारणे, त्यावर उपाययोजना तसेच स्त्रीभ्रूण हत्या, कारणे, विविध कायदे इत्यादी विषयांवर पोस्टर तयार करण्यात आले.
या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे पोस्टर प्रेसेंटेशन केले. या उपक्रमामध्ये डॉ.वाघोळे ,डॉ. देवके, डॉ. भगत, डॉ. पवार , डॉ.ताकतोडे, डॉ.खान, डॉ. रमिज,प्रा. पडवाल,प्रा. एस .एस.जाजू उपस्थित होते . संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कला विभागाचे पोस्टर प्रेसेंटेशन राबविण्यात आले.
या उपक्रमामध्ये बी.ए. भाग 3 चे मयुरी कांबळे, नीता देवळे, मोहना पंडित, भारती इंगोले, प्रगती पाकधने, वैष्णवी घोडे, रेणू गोरटे, ज्ञानेश्वरी डुकरे इत्यादी तर बी.ए. भाग 2 चे अंजली मनवर, प्रिया राऊत, साक्षी भगत, वैष्णवी राऊत, मोहिनी मनवर, वैष्णवी ठाकरे, वैष्णवी भगत, ललिता निंबेकर, सुप्रिया भगत, राणी जामनिके, शरयू इंगोले, मोहिनी इंगळे, प्रतिक्षा चौधरी, रोशनी चौधरी, अंजली बोंबले , प्रज्ञा चुंबळे व सोनम शृंगारे, इत्यादी विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला. गृहअर्थशास्त्र विभागाचे एकूण 15 पोस्टर होते. एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या उपक्रमामध्ये डॉ.शिंदे, डॉ. मोरे, डॉ.जाधव, डॉ. चौधरी, डॉ. मते, डॉ. खंडारे, डॉ. रासेकर, डॉ. कडू, प्रा.मनवर,श्री गिरवडे, श्री बोरचाटे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती व उपक्रमामध्ये जवळपास 50 पोस्टर्स होते.बी.ए व बी.एससी. च्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला व हा उपक्रम यशस्वी संपन्न झाला.
0 Comments