वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरीचा आलेख वाढतच असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गत वर्षभरात लोकसेवकांसह खासगी व्यक्ती मिळून २४ जणांवर लाचप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 2022- 2023 मध्ये लाचखोरीचे प्रकार दुप्पट झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
लाचखोरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे सर्वज्ञात असूनही शासकीय अधिकारी-कर्मचारी त्यापासून दूर राहू शकत नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून उघड होत आहे. नागरिकांना त्यांच्या अधिकाराचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्रासपणे लाच मागून वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत.
अनेक जण जाऊ द्या, आपले काम करून घेणे बरे, कशाला भानगडीत पडायचं, अशी भूमिका घेत तक्रार करण्यास धजावत नसल्याने लाचखोर लोकसेवकांचे चांगलेच फावत आहे. वाशिम परिक्षेत्रात गत वर्षभरात १४ सापळे यशस्वी झाले.
यात एकूण २४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात आरोपी लोकसेवकांची १७, तर खासगी व्यक्तींची संख्या ७ आहे. या प्रकारामुळे जिल्हा चर्चेत आला आहे. खोटे नाते काम करून आपले उकड पांढरे करणारे सर्रास भ्रष्टाचार करत असल्याचे दिसून येत आहे. खऱ्यांना हेलपाटे. खोट्याचे काम ताबडतोब असे अनेक विभागात प्रकरण असल्याचे जनसामान्यात बोलले जात आहे.
वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या आर्थिक वर्षात २४ जणांना सापळा रचून अटक केली आहे. लाचखोरीमध्ये पोलिस दलातील सर्वाधिक ११, त्या खालोखाल महसूल ०५, ग्रामविकास विभाग ०४, तर शिक्षण आणि भूमी अभिलेख विभागातील प्रत्येकी एक
आरोपी आहे.
भ्रष्टाचार म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या पदाचा गैरवापर करून समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेणे, लाच घेणे किंवा गैरमार्गाने स्वत: चा फायदा करून घेणे याला सुध्दा भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचारामुळे देशाची प्रगती मंदावते, भ्रष्टाचारामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक त्यांच्या हक्कापासून वंचीत राहतात.
भ्रष्टाचार हा फक्त पैशांच्या माध्यमातूनच केला जातो असे नाही, समोरच्या व्यक्तीचे काम करण्याच्या बदल्यात कोणी गाडी मागतो, बंगला 1 मागतो, पार्टी मागतो किंवा अनेक प्रकारे समोरच्या व्यक्तीला पैसे खर्च करण्यासाठी लावणे हा सुध्दा भ्रष्टाचार म्हटला जातो.
एखाद्या गरजू व्यक्तीची फाईल संबंधित कार्यालयात गेल्यास त्यास एजंटच्या माध्यमातून सांगण्यात येते की, तुम्हाला तुमची फाईल मंजूर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एवढी रक्कम द्यावी लागेल, किंवा अमुक अमुक वस्तू द्यावी लागेल. अनेकजण नाईलाजाने पैसे देवून काम करून घेतातही परंतू गोरगरीब व सर्वसामान्य माणूस पैसे देवू शकत नाही आणि पैसे न दिल्यामुळे तो योजनेपासून वंचित राहतो.,
२०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये दुप्पट प्रकरणे लाचखोरीच्या प्रकरणांचा आलेख वाढताच हे थांबवणे काळाची गरज. अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास .मा संघटक सुधाकर चौधरी
0 Comments