Ticker

6/recent/ticker-posts

वरुड येथे हस्तकौशल्य व पाककृती कार्यशाळा उत्कृष्टरित्या संपन्न-

मंगरूळपीर-मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ ,कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत दत्तक ग्राम वरुड येथील नवयुवती व महिलांकरिता दोन दिवशीय *हस्त कौशल्य व पाककृती* कार्यशाळेचे आयोजन दिनांक-11 व 12 एप्रिल 2023 रोजी येथील ग्रामपंचायत हॉल येथे करण्यात आले.
      हस्तकौशल्य कार्यशाळे चे अध्यक्ष सौ. शोभाताई गावंडे, प्रमुख अतिथी सौ. अन्नपूर्णाताई गायकवाड आणि शीलाताई कड तसेच प्रमुख मार्गदर्शक समन्वयक प्राध्यापक  सौ. एस. एस.जाजू हे होते.
      सर्वप्रथम मा जिजाऊ यांच्या प्रतिमा चे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले व तसेच पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्राध्यापक सौ.जाजू यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक व उद्देश स्पष्ट केले तसेच मान्यवरांचे मनोगत झाले, आणि अध्यक्ष भाषणात सौ. शोभाताई गावंडे यांनी कार्यशाळेचे कौतुक केले.
        हस्तकौशल्य कार्यशाळेमध्ये बी.ए. भाग 1 चे 17 विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले, त्यात विविध वस्तू प्रात्यक्षिकेद्वारे करून दाखवले त्यात अश्विनी फड, प्रणाली भोयर यांनी पूजा थाली मॅट, विद्या नाकाडे, पायल गावंडे यांनी तोरण, स्वाती वानखडे, अर्चना पांडुळे यांनी झुंबर, संतोषी हवा, पल्लवी भगत यांनी मायक्रोनचे मिरर, ऋतुजा धोत्रे, चैताली महल्ले, रेखा भगत यांनी पर्स आणि बदक, निशा कोसरे, भावना खंडारे यांनी पायदान, पायल गावंडे ,प्रिया वानखेडे यांनी लोकर ची डॉल, स्वाती इंगोले यांनी फ्लावर पॉट, तर प्रा. जाजू यांनी ब्लॉक प्रिंटिंग,हे सर्व प्रात्यक्षिकेद्वारे करून दाखवले.
       कार्यशाळेचे सूत्रसंचालन अश्विनी फड यांनी तर आभार प्रदर्शन भावना खंडारे यांनी मानले. कार्यशाळेत 55 लाभार्थी यांनी लाभ घेतला.
       तसेच दिनांक 12  एप्रिल 2023 ला पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्ष सौ. शितलताई गावंडे (सरपंच) तसेच प्रमुख अतिथी सौ. गीताताई राऊत, पूजाताई चौधरी, शारदाताई गावंडे, सीमाताई गायकवाड तसेच प्रमुख मार्गदर्शक समन्वयक प्रा. सौ. एस. एस.जाजू हे मंचकावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . कार्यशाळेचे प्रास्ताविक व उद्देश प्रा. जाजू यांनी स्पष्ट केले.यात बी.ए. भाग 2 व 3 च्या विद्यार्थिनींनी प्राची भड, भारती इंगोले यांनी पिझ्झा, प्रगती पाकधने ,वैष्णवी घोडे यांनी डोनट, नीता देवळे ,मोहन पंडित यांनी व्हेज रॅप, तसेच बी.ए. भाग 2 चे साक्षी भगत, वैष्णवी राऊत यांनी मेथी बीट फ्राईज, वैष्णवी ठाकरे ,मोहिनी इंगळे यांनी फ्लावर फ्राईस, अंजली मनवर, प्रिया राऊत यांनी चीज सँडविच, सुप्रिया भगत ,अंजली बोंबले यांनी कप केक, ललिता निंबेकर ,प्रज्ञा चुंबळे यांनी दाबेली, रोशनी चौधरी , सोनम शृंगारे यांनी मंचुरियन, राणी जामनिके, वैष्णवी भगत यांनी कच्च्या आलू रवा पुटींग, शरयू  इंगोले ,प्रतीक्षा चौधरी यांनी आलू टिक्की , मोहिनी मनवर यांनी पास्ता असे विविध पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ प्रात्यक्षिकेद्वारे सर्वांना करून दाखविले.
कार्यशाळेचे संचालन नीता देवळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रिया राऊत यांनी मानले. कार्यशाळे करिता गावातील सर्व मंडळीचे सहकार्य लाभले व कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
    
 
ही कार्यशाळा संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्राचार्य डॉ.कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात प्रा.सौ. एस. एस. जाजु यांनी आयोजित केली व यशस्वी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये जवळपास 60 गावातील  नवयुवती व महिलांनी सहभाग घेतला. व महाविद्यालयातील 20 विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व गावकरी मंडळी यांनी या पाककृतीचे आस्वाद घेतले व कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
               समन्वयक
     गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
     प्राध्यापक सौ. सुषमा जाजु

Post a Comment

0 Comments