Ticker

6/recent/ticker-posts

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा पारदर्शक घ्या!अन्यथा वाशीम जिल्ह्यात आंदोलन, राकाँ अल्पसंख्याक शहराध्यक्ष इरफान शेख यांचा इशारा

दि २९ एप्रिल २०२३ रोजी वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये विविध परिक्षा केंद्रावर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या आहे. त्या केंद्रांवर कोचींग क्लासेस चे पर्यवेक्षक व शिक्षक नेमु नयेत, सर्व परीक्षा पारदर्शक घ्याव्यात, अन्यथा वाशीम जिल्हा भर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे,

जवाहर नवोदय विद्यालय ही संकल्पना ग्रामीण भागातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, बहुजन आणि अल्पसंख्याक लोकांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रवाहात आणुन शासकीय शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे होय. पण मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील जिल्हापरिषद, नगर परिषद आणि खाजगी कोचिंग क्लासेसच्या परीक्षेतील वाढत्या हस्तक्षेपामुळे
नवोदय विद्यालय प्रवेश
जवाहर नवोदय विद्यालय हे फक्त जिल्हा परिषद, नगर परिषद शिक्षकांचे, त्यांच्या निकवर्तीयांचे पाल्य आणि खाजगी कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी यांना परिक्षा केंद्रावर साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करुन सहकार्य केले जाते व त्यांचेच विद्यार्थी चांगले गुण घेऊन निवडले जातात. हा एक प्रकारचा ग्रामीण भागातील सामान्य, गरीब, शेतकरी, कष्टकरी, दलीत, बहुजन, अल्पसंख्याक आणि असहाय कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. शिक्षक आर्थिक व शैक्षणिक दृष्टया समृद्ध असताना ते त्यांच्या पाल्यांना स्वतःच्या शाळेत न शिकवता
शॉर्टकट काढुन नवोदय मध्ये प्रवेश मिळवून देतात. ग्रामीण नोकरदार वर्गाच्या पाल्यांना जवाहर नवोदयमध्ये वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर प्रवेश देण्यात येऊ नये. त्यामुळे २९एप्रील २०२३ ला होणार्या प्रवेश परिक्षेत जिल्ह्यातील कोणत्याही जिल्हापरिषद, नगर परिषद आणि खाजगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना वर्गावर पर्यवेक्षक म्हणून देण्यात येऊ नये तसेच त्यांच्याकडुन कोणत्याही विद्यार्थ्यांना परिक्षेत सहकार्य होईल अशा कृतीवर पायबंद घालण्यात यावा. वाशिम जिल्ह्यातील कोणत्याही परिक्षा केंद्रावर अशाप्रकारच्या कृती होऊन सामान्य कुटुंबातील, शेतकरी, कष्टकरी, दीनदलीत, अल्पसंख्याक आणि मजुर वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संपूर्ण वाशिम जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल. करीता माहितीस्तव सादर, असे निवेदनात म्हटले आहे.



Post a Comment

0 Comments