Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष विषयावर कार्यक्रमाचे आयोजन


मंगरूळपिर ता. प्र. दि.०४

मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील श्री शिवाजी बी. सी. वसतिगृह वनोजा येथे दिनांक ०१ एप्रिल ते ०१ मे सामाजिक न्याय पर्वाचे अवचित्य साधुन दिनांक ०४ एप्रिल  रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
याप्रसंगी वसतिगृहामध्ये विध्यार्थ्याकडून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व आपले कला कौशल्य विद्यार्थ्यानीं  मनोगतातून व्यक्त केले. ह्या वेळी कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत चे सरपंच डॉ मुखमाले आणी ग्रा.पं. सदस्य गोवर्धन पाटील वसतिगृहाचे संचालक अक्षय पाटील पत्रकार सचिन राणे वसतिगृहाचे अधीक्षक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 

Post a Comment

0 Comments