Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्र्यांच्या हस्ते महाज्योतीच्या टॅबचे विद्यार्थ्यांना वितरण

वाशिम दि.१०
 पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ७ एप्रिल रोजी महाज्योतीकडून प्राप्त टॅबचे वितरण कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील श्रीजय निंगोट आणि धनज (बु) येथील प्रद्युम्न बोरकर या इयत्ता अकरावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाट यांची प्रमुख उपस्थिती होती.इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था( महाज्योती) मार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे.
 विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून टॅब उपलब्ध होत असल्यामुळे शिक्षणाला चांगला हातभार लागत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments