वाशिम जिल्ह्यात रविवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने फळबाग, भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. काही भागात गारपिट झाली असून, झाडेही उन्मळून पडली.
यंदाच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, वादळवारा आणि गारपिटीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मार्च महिन्यातही १४ ते २० तारखेदरम्यान अवकाळी पाऊस, गारपिट झाली होती. आता एप्रिल महिन्यातही सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस, गारपिट असल्याने फळबागा, भाजीपाला यांसह अन्य पिकांचे नुकसान
मंगरूळपीर तालुक्यातील विविध भागात गत दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस बरसत आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेली हळद भिजल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसला, हळद काढणीचे काम सुरु असतानाच अधुनमधून अवकाळी पाऊस बरसत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्याची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र आहे. शेतातील वेचणीचे कामे देखील प्रभावित झाले. अशातच ९ एप्रिल रोजी चेहेल परिसरात अवकाळी पाऊस बरसल्याने हळद, गहू, भाजीपालावर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले. परिसरातील चेहेल धानोरा कोठारी बोरवा कवठळ आदी भागात सातत्याने अवकाळी पाऊस बरसत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. रविवारी पावसासोबतच गारपिट झाल्याने देखील पिकांचे नुकसान झाले. ज्या भागात नुकसान झाले आहे अशा भागात पाहणी करुन शेतकऱ्याना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. हळद या पिकाचा विमा काढल्या जात नाही त्यामुळे शेतकरी आणखीनच चिंतेत पडला आहे, गावरान आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाची काही मोजक्या प्रमाणातच सर्वे केला जात आहे.
विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकच धांदल उडाली. अवकाळी पाउस व वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठासुद्धा खंडीत झाला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भाजीपाला व फळ पिकांचे नुकसान झाले. गत महिन्यात सुद्धा तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात . रविवारी पुन्हा झालेल्या अवकाळी पावसाने शेतकयांच्या भाजीपाला व फळपिकाचे नुकसान झाले. मंगरुळपीर तहसिल कार्यालयाच्या आवारातील दोन झाडे उन्मळून पडली तसेच रस्त्यावरील काही दुकानदारांचे नुकसान झाले. तालुक्यातील गारपीट झाल्याने शेतकऱ्याचे पपई, बिजवाई कांदा, टरबूज, आंबा, हळद, तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले
0 Comments