Ticker

6/recent/ticker-posts

घनश्याम मापारी यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश..!!


रिसोड तालुक्यात सामाजिक कार्यात शेतकऱ्यांच्या समस्यावर आवाज उठविण्यासाठी सक्रिय सहभाग घेत असलेले रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक व मोहजा इंगोले गावचे माजी सरपंच व सेवा सोसायटी चे अध्यक्ष घनश्याम मापारी यांचा खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर कव्हर, विश्वनाथ सानप माजी सभापती जि.प. वाशिम, उपजिल्हाप्रमुख अशोक अंभोरे, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक डॉ. चंद्रशेखर देशमुख, सह रिसोड तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मापारी यांच्या प्रवेशाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे घनश्याम मापारी यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. घनश्याम मापारी यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेशामुळे होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बळ मिळेल असे बोलले जात आहे..

Post a Comment

0 Comments