वाशिम - येथील सामटीव्ही या वृत्तवाहीनीचे जिल्हा प्रतिनिधी व धडाडीचे पत्रकार गजानन भोयर (वय ४७) रा. वांगी यांचे गुरुवार, ६ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. स्व. गजानन भोयर हे आपल्या मनमिळाऊ व हसतमुख स्वभावामुळे सर्वाच्या परिचयाचे होते. सामटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पत्रकारीतेचा वेगळा ठसा उमटवत सर्वसामान्य तसेच शेतकर्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या अकाली निधनाने त्यांचे चाहते, मित्रमंडळी आदींना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अंत्यसंस्कार शुक्रवार, ७ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी ग्राम वांगी ता.जि. वाशिम येथे होईल. त्यांच्यामागे पत्नी, ४ मुली, १ मुलगा व बराच आप्तपरिवार आहे. नुकतेच त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले होते. एक अत्यंत चांगला मित्र, कर्तव्यदक्ष पत्रकार, मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या अकाली जाण्याने जिल्ह्याच्या पत्रकारीतेची फार मोठी अपरिमित हानी झाली असून जिल्हयातील सर्व पत्रकार बांधवांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments