Ticker

6/recent/ticker-posts

झाडाची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहेत एक तरी झाड लावा ज्योती ताई ठाकरे

      ज्योतीताई मनोज ठाकरे राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष वाशिम

वृक्षारोपणाचे किती महत्त्व आहे आज आपण जाणून घेऊया अनेक तज्ञांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपले विचार मांडले एवढेच नव्हे तर साधू संतांनी सुद्धा वृक्षारोपणावर प्रबोधन केले प्रशासनाने लाखो रुपयांच्या स्कीम काढून वृक्षारोपणाला सुरुवात केली परंतु काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण झाले तर काही ठिकाणी कागदोपत्री म्हणून म्हणतो वृक्षारोपणाचे किती महत्त्व आहे जाणून घेऊया सविस्तर एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.
 याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 
 एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 
एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 
      म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.

   आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. असे मत वाशिम जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांनी व्यक्त केले

Post a Comment

0 Comments