Ticker

6/recent/ticker-posts

समाजकार्य महाविद्यालयात खडकी अकोला.येथे सामाजिक न्याय समता पर्व " अंतर्गतक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न


      आयुक्त समाजकल्याण, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार 01 एप्रिल 2023 ते 01 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय समता पर्व अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम जिल्हास्तरावरून हाती घेण्यात आले आहे. या सामाजिक न्याय पर्वा मध्ये मा. सहाय्यक आयुक्त कार्यालय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अकोला. व श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला. महाविद्यालयातील समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन 1 एप्रिल 2023 पासून 1 मे 2023 पर्यंत करण्यात आले आहे. तसेच दिनांक 11- 4 - 2023 रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पटनाट्य स्पर्धा, यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संकेत काळे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.बळीराम अवचार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका डॉ. कविता कावरे मॅडम होत्या. तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.केशव केशव गोरे व्यासपीठावर उपस्थित होते. वरील कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला विचारमंचावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य.डॉ.केशव गोरे सर यांनी केले. प्राचार्य गोरे यांनी  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात  तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी असे म्हणतात भारतीय समाजव्यवस्थेची   पुनर्रचना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचे रान केले. शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहताना आर्थिक आणि सामाजिक समतेसाठी या महानायकाने युद्ध छेडले. लोकशाहीच्या या प्रखर पुरस्कर्त्याने सामाजिक न्यायाशी लढाई रस्त्यावर रक्ताचा एकही थेंब न सांडविता जिंकली. आंदोलन हेच त्यांचे जीवन बनले होते. बुद्धीप्रामाण्यवाद, विज्ञानवाद आणि विवेकवादाची बीजे पेरीत स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभावाच्या महावृक्षांना धम्माची फळे या बोधिसत्वामुळे प्राप्त झालीत आधुनिक भारताच्या या निर्मात्याने उभ्या केलेल्या उभ्या केलेल्या संघर्षाला अत्यंत आदरपूर्वक विनम्र अभिवादन केले असे प्रतिपादन प्राचार्य यांनी केले. यानंतर प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉ. बळीराम अवचार सर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेले महान कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच  "विद्याविना मती गेली मतिमिना नीती गेली नितीविना गती गेली गती विना वित्त गेली वित्तविनाश शुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्याने केले.
वरील काव्यातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दाखविले, तसेच भारतातील बहुजनांना आणि सर्व हार समाजातील स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून त्यांना स्वस्तित्वाची जाणीव करून देणारे थोर आघ समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विस्तृत पणे प्रकाश टाकला. नंतर समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुद्धा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या प्राध्यापिका डॉ. कविता कावरे मॅडम यांनी महामानव ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचनाच्या आणि अभ्यासाबाबतचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.पी. आर. पाचपुते आणि डाॅ. अर्चना धर्मे यांनी विद्यार्थ्यांच्या वकृत्वाचे मूल्यांकन केले, तर वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. सपना खंडारे बी.एस.डब्ल्यू सेकंड इयर या विद्यार्थिनीचा आला. तर दुसरा क्रमांक प्रवीण आठवले एम एस डब्ल्यू फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड या विद्यार्थ्यांचा आला तर तिसरा क्रमांक कु. श्रेया देशमुख बीएसडब्ल्यू सेकंड ईयर या विद्यार्थिनीचा आला. वरील कार्यक्रमाकरिता वरील कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल खंडारे या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी शिंदे या विद्यार्थ्यांनी केले. व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
 (क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना )

Post a Comment

0 Comments