Ticker

6/recent/ticker-posts

कासोळा येथे समाज कल्याणच्या योजनांची दिली माहिती


वाशिम,दि.१४ 
 जिल्ह्यात १ मेपर्यंत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा येथे समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती १३ एप्रिल रोजी उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे नारायण बर्डे यांनी उपस्थित ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना,दिव्यांग बीज भांडवल योजना,दिव्यांग-अव्यंग विवाह योजना,सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना,आंतरजातीय विवाह योजना,जिल्हा परिषद सेस फंड योजना,वृध्दांकरीता वृध्दाश्रम योजना,अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजना यासह अन्य योजनांची माहिती दिली. तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली 'समता' ही 'दिनदर्शिका' व 'समर्पण' घडीपुस्तिका उपस्थित ग्रामस्थांना यावेळी  देण्यात आली.

Post a Comment

0 Comments