राजकारणातील डावपेच पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याने अनेकदा त्या व त्यांचे कार्यकर्ते यावरून नाराज असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी कुणासमोर झुकणार नाही असे इशारा वजा वक्तव्य केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांना भाजपने प्रंचड त्रास दिला आता पंकजा मुंडेंसोबतही तेच होतंय, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. "स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे हयात असताना, त्यांना भाजपानं किती त्रास दिला? हे मला माहीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली.
त्यावेळी मी स्वत: त्यांच्याबरोबर हजर होतो. मधल्या काळात त्यांची इतकी छळवणूक झाली की, त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार येत होता. पक्ष सोडून द्यावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. तोच प्रकार आता पंकजा मुंडेंबरोबर सुरू आहे.” असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
0 Comments