मंगरूळपीर दिनांक 2
वाशिम येथील दि 29 ते 31/03/23 तीन दिवसीय कार्यशळा नेहरू युवा केंद्र वाशिम क्रिडा मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत युवांसाठी युवा नेतृत्व एवं समुदाय विकास प्रशिक्षण मा गंगा मेमोरियल हॉस्पिटल बाहेती हाॅल येथे पार पडली यामध्ये वाशिम च्या विविध महाविद्यालयाच्या युवक युवतीने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये यशदाच्या प्रेरणादायी वक्त्या अश्विनीताई राम औताडे यांनी स्त्री पुरुष समानता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारत देशाला 75 वर्षे झाले स्वातंत्र्य मिळुन तरी पण स्त्री पुरुष समानता हा विषय आज तितकाच महत्त्वाचा आहे काही ठिकाणी महिलांना त्यांच्या अधिकारापासून हक्कापासून वंचित ठेवण्यात येते तर काही वेळी त्यांना डावल्या जाते माहित असूनही पण भीतीपोटी त्याविरुद्ध त्या काही एक बोलत नाही आजही ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये महिलांवर तेवढेच अन्याय अत्याचार होत आहेत त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही किंवा ती परिस्थिती बदलवण्यासाठी कोणी प्रयत्न पण करत नाही. स्त्रीच्या पोटात जेव्हा गर्भ ठरतो तेव्हापासूनच तिचा संघर्ष चालू होतो मुलींचा गर्भ असेल तर तो काढुन टाकण्यात येतो आजपण. काही ठिकाणी एकीकडे महिला खूप सक्षम बनुन विविध क्षेत्रांमध्ये पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहे एकीकडे तेवढ्याच प्रमाणात काही महिला सगळ्या गोष्टी पासून वंचित आहेत त्यांचे अधिकार त्यांचे हक्क या कुठल्याही गोष्टीची त्यांना जाणीव नाही, त्यांचा परिस्थिती मध्ये कुठली ही सुधारणा नाही. प्रत्येक ही ठिकाणी दरी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही दरी कमी करण्यासाठी व सगळ्याच महिलांना त्यांच्या अधिकार मिळाले पाहिजे आणि त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी काम करावे लागेल. असे यावेळी मार्गदर्शन करताना अश्विनीताईंनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे
नेहरू युवा केंद्र वाशिम युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार
जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत लेखापाल अनिल ढिंगे युवा स्वयंसेविका अर्चना मुंढे, प्रिंयका इंढोळे, युवा स्वयंसेविक दत्ता मोहळे ,प्रदीप पट्टेबहादूर आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments