Ticker

6/recent/ticker-posts

अजातशत्रु असलेले समाजसेवी व्यक्तीमत्व म्हणजे लॉ. वसंतराव धाडवे - प्रकाश पोहरे


दिव्यांगांना सायकल, अंधांना काठी तर गरीब महिलांना साडी व शिलाई मशीन वाटप


३२७ जणांची नेत्रतपासणी करुन ११० जणांची नांदेड येथे मोफत नेत्रशस्त्रक्रिया
वाशिम - जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे हे सेवाभावी व्यक्तीमत्व असून त्यांनी तो वसा आजन्म घेतला आहे. कोरोनाकाळात त्यांनी केलेले समाजकार्य अव्दितीय आहे. दीनदलीतांसाठी अहोरात्र झटणारे लॉ. धाडवे हे जात, धर्म, पंथ आणि पक्षभेद बाजुला सारुन समाजसेवेचे कार्य करतात. त्यामुळे अजातशत्रु असलेले समाजसेवी व्यक्तीमत्व म्हणून लॉ. धाडवे यांची वेगळी ओळख असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी केले.

    स्थानिक आयुडीपी येथील सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजच्या प्रांगणात २ एप्रिल रोजी लॉ. वसंतराव धाडवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व त्यानिमित्त सेवा महोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा शिपींग कार्पोरेशन नवी दिल्लीचे संचालक अ‍ॅड.विजयराव जाधव हे होते तर उद्घाटक म्हणून शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक, दिलीपबाबा लाठी, श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रल्हाद राऊत, ठाणेदार रफीक शेख, राजुभाऊ चौधरी, प्रा. दिलीप जोशी, जनार्दन पाटील मगर, शिवसेना शहरप्रमुख शाम दुरतकर, उद्योजक मोटवाणी, सावजी, बाजार समिती सचिव बबन इंगळे, सत्कारमूर्ती लॉ. वसंतराव धाडवे व सौ. सुनंदा धाडवे यांची उपस्थिती होती.
   
 प्रारंभी अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहूण्यांचा लॉ. धाडवे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
तसेच वाढदिवसानिमित्त लॉ. वसंतराव धाडवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरीब महिलांना साड्या व शिलाई मशीन वाटप, दिव्यांगांना काठी व सायकलचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नंदीग्राम लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. क्षिरसागर, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. साळवे व त्यांच्या टिमच्या वतीने शिबीरात सहभागी ३२७ व्यक्तींची नेेत्रतपासणी करण्यात आली व त्यात पात्र एकूण ११० रुग्णांना मोफत मोतीबिंदु नेत्रशस्त्रक्रियेसाठी नंदीग्राम लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड येथे लक्झरी बसने पाठविण्यात येणार आहे.
    रंजल्यागांजल्यात सदैव देव पाहणारे समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांना ६७ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते अभिष्टचिंतन करुन सत्कार करण्यात आला. तसेच परभणी येथील आश्रमशाळेतील कर्मचारी वर्गाने सुध्दा धाडवे यांचा सत्कार केला. यावेळी धाडवे यांनी दिलीपबाबा यांचे आशिर्वाद घेतले.
    
अध्यक्षीय भाषणात बोलतांना अ‍ॅड. विजयराव जाधव म्हणाले की, वसंतराव धाडवे खरोखरच रंजल्यागांजत्यात सदैव देव पाहणारे समाजसेवक असून ते या पदवीचे खर्‍या अर्थाने अधिकारी आहेत. ते समाजसेवेसाठी सदैब तत्पर असतात. त्यांच्या या कार्यात त्यांच्या कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. प्रा.दिलीप जोशी म्हणाले की, जेष्ठ समाजसेवक वसंतराव धाडवे यानी हलाखीच्या स्थितीत दिवस काढले आहेत. त्यामुळे गरिबीचे चटके त्यांना ज्ञात आहेत. म्हणूनच ते दीनदुबळ्यांची मदत करण्यासासाठी सदैव तत्पर असतात. गोरगरीब गरजवंत यांच्यातच ते देव पाहतात आणि त्यांना मदत करतात. लाठीचे दिलीपबाबा म्हणाले की, लोक निवडणूका आल्यावर समाजसेवेचे नाटक करतात. मात्र लॉ. धाडवे हे कोणतीही अपेक्षा व निस्वार्थीपणे वर्षभर समाजसेवेचे कार्य सुरुच असते. त्यामुळे धाडवे यांचे कार्य हे खरोखरच ईश्वरीय कार्य आहे.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रविण धाडवे, सुत्रसंचालन पल्लवी ताटेवार यांनी तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. प्रशांत धाडवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चंचल खिराडे, डॉ. शितल धोंगडे, प्रा. पुजा धाडवे, नर्सिग कॉलेजचे ट्युटर विद्या शिरसाट, दिव्या इंगोले, श्रीमती रामटेके, राहुल शेंडे, नौशाद शेख, प्रविण वानखडे, गणेश खंडारे यांच्यासह नंदीग्राम लॉयन्स नेत्र रुग्णालय, लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळ तसेच सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेेतले. या कार्यक्रमास धाडवे यांचे चाहते तथा लाभार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments