पुणे येथे
दिशा सोशल फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त
दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असते यावर्षी
दिशा सोशल फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दिलखुलास गप्पा चार चौघीं शी या कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याशी वाशिम जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्षा ज्योतीताई ठाकरे दिलखुलाश या कार्यक्रमात उपस्थित राहून वाशिम जिल्ह्याच्या महिलांच्या समस्या प्रती संवाद साधला रूपाली ताई पुढे म्हणाल्या आपले कार्य असेच पुढे चालू ठेवावे तसेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीची जबाबदारी निश्चितपणे पार पाडसाल आणि जिल्ह्यात आपले कार्य असेच चालू ठेवावे
"आजची स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे” किती विरोधाभासाने भरलेले वाक्य आहे हे ! आजही एका स्त्रीला तिची योग्यता, कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी पुरूषासोबत तुलनात्मक दृष्टीने बघीतले जाते.
देश स्वतंत्र झाला. पुरूषांसोबतच स्त्रीयांनाही स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. परंतु तो अधिकार केवळ नावापुरताच असल्याचे चित्र आजही आपल्याला सहज दिसुन येते. कारण आजही स्त्री पुरुष विषमता आहे. आजच्या सोकॉल्ड स्त्री पुरुष समानतेच्या काळात स्त्रीयांना स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला दिसून येत नाही.
बदलत्या सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय, किंवा सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले
आजच्या स्त्रीने आपल्या भावना, विचार, कौशल्य हे विविध माध्यमांतून बोलत्या करणे गरजेचे आहे. महिला आयोगाच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने
व्यासपीठ माझ्या सर्व सख्यांसाठी नेहमीच खुले असेल.
0 Comments