वाशिम - सामाजीक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सोमवार, ६ मार्च रोजी सायंकाळी स्थानिक मोक्षधाम स्मशानभूमीत स्मशान होलिकोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या होलिकोत्सवात गुटखा, बिडी, सिगारेट, तंबाकू, दारू, प्लास्टिक पन्या, गांजरगवत इत्यादी वस्तुंची होळी करण्यात येत असते. यंदाचे हे या उपक्रमाचे १७ वे वर्ष आहे. सर्वप्रथम सर्व सामाजीक कार्यकर्त्यांनी स्मशानाचा परिसर झाडू, खराट्याने झाडून स्वच्छ केला. जवळपास दोन तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर गुटखा, बिडी, सिगारेट, तंबाखु, दारू, प्लॅस्टिक पन्या, गांजरगवत आदी वस्तूंची होळी करण्यात आली.
सर्वांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहावे हा संदेश हा या स्मशान होलिकोत्सवातून देण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष सुशिल भिमजियाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल घारड, अॅड. सुरेश टेकाळे, आशिष इंगोले, वृषाली टेकाळे, संगीता इंगोले, रवी गुप्ता, राजू धोंगडे, कृष्णा डावर, दिलीप बरेटीया, निर्मला खंडारे बोरकर, श्रुती खंडाळकर, पवन विभुते, राहुल कांबळे, बंडू गव्हाणे, पवन खुळे, हर्षवर्धन टेकाळे, रामेश्वर खंडारे, कुंडलिक मडके, शेषराव खंडारे, रुपाली देशमुख, निलेश अवचार, राजुभाऊ किडसे, नाना देशमुख, प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, नितीन शिवलकर, अमित तरहळकर, गजानन देशमुख, शाम भोंगळ, रवी हजारे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments