नवनियुक्त सरपंचांचा सन्मान
मंगरुळपिर ता १४: जल है तो कल है धकाधकीच्या जीवनात पाण्याला खूप महत्त्व आहे. पाणी हे उन्हाळी हंगामात सिंचनाच्या शेतीसाठी गरजेचे असले तरी शेतकऱ्यांनी पाणी कायम जपून वापरावे. तसेच शहरी असो वा ग्रामीण भागात घरात वा घरकाम करतांना कमीतकमी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा तुटवडा पुढील पिढीला प्रकर्षाने भासणार आहे. भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये.यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावे
असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी ता १४ रोजी कासोळा येथील सभागृहात आयोजित नवनिर्वाचित सरपंच व सेवा सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सत्कारा सोहळ्यात ते बोलत होते .
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे तर प्रमुख उपस्थिती मध्ये विठ्ठलराव गावंडे,महादेवराव आबा,वसंतराव पाटील,काशिनाथ ठाकरे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे,आत्माराम गावंडे,भाऊराव व्यवहारे,ऍड प्रकाश इंगोले,रमेश शिंदे,मिसाळ,डॉ जायभाये,डॉ दत्तात्रय चौधरी,शालीग्राम राऊत,उत्तमराव इंगोले,मिलिंद पाकधने,हरिष महाकाळ, सचिन राऊत, साहेबराव भगत,रहेमान खान पटेल,मुसा पटेल,रमेश नावंधर ओम बंग,नंदलाल जाखोटीया, डॉ असावा , सौ.ज्योती ताई मनोज ठाकरे राष्ट्रवादी वाशिम जिल्हा काय अध्यक्ष , प्रमिला ताई शेकळे ,डीपल ताई ठाकरे , सोमनाथ धोटे.यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांची राम पाटील मित्र मंडळ उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सुभाषराव ठाकरे म्हणाले की मंगरुळपिर तालुक्यातील सर्व सरपंचांनी गावामध्ये काम करीत असतांना इमानदारीने काम करा, गावात हेवाद्याचं वातावरण होणार नाही. गावचे सरपंच हे विश्वस्त आहेत आणि त्यांच्या गावाच्या विकासाची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर आहे.गावाच्या प्रगतीसाठी व्यापक स्वरूपात काम करावे,ग्रामीण जनतेचे ग्राम विकासाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक काम करण्याची गरज आहे.
लोक सहभागाशिवाय गावाचा विकास अशक्य असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सेवा सोसायटीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला, तर महिला सरपंचा व सेवा सोसायटीच्या महिला सदस्यांना साडी-चोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान गावातील प्रत्येक नागरिकांचा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुण इंगळे यांनी केले तर कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती, वं स्नेहभोजना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पाणी
आजोबांनी पाहिले ते नदी मध्ये,
वडिलांनी पाहिले ते विहीरी मध्ये,
आपण पाहतोय ते नळामध्ये, आपली मुले पाहातील बाटली मध्ये,
नातवंड पाहतील कॅप्सूल मध्ये, जर आता याकडे दुर्लक्ष केले तर ते आपण पाहू फक्त 'आश्रू मध्ये.
पाणी वाचवा, जीवन वाचवा.
0 Comments