पत्रकार परिषदेतून मांडणार पक्षाची आगामी भूमिका
वाशीम (दि.२५): स्थानिक शासकीय विश्रामगृह, वाशीम येथे संभाजी ब्रिगेडचे एक दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभदादा खेडेकर, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक तथा वाशीम जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. प्रेमकुमार बोके, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांची उपस्थिती राहणार आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडच्या विदर्भ दौऱ्यास वाशीम पासून प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यात ते संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. सोबतच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंशी बातचीतही करणार आहेत. या पत्रकार परिषदेसाठी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, जिल्हा अध्यक्ष गणेश सुर्वे, जिल्हा महासचिव शेख इसाक शेख परवेज, जिल्हा प्रवक्ता विकास देशमुख, जिल्हा प्रवक्ता गजानन खंदारे यांची उपस्थिती राहणार आहे.
संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यकारणीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे अजय गवारगुरु यांनी केले आहे.
0 Comments