स्थानिक (मंगरूळपीर ) श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा व्दारे संचालीत यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर जि. वाशिम येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा (IQAC) मार्फत ऑनलाईन पध्दतीने "बौध्दिक संपदा हक्क आणि पेटेंट व डिझाईन फाईलींग" (Intellectual Property Right (IPR) and Patents and Design Filing ) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळा online म्हणजे आभासी पध्दतीने होणार असून या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून राजीव गांधी नॅशनल इनस्टीटयुट ऑफ इंटीलेक्टयुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूरचे डॉ. भारत एन.सुर्यवंशी Assistant controller of Patents and Designs हे मार्गदर्शन करणार आहे.
कार्यशाळा दिनांक २४ मार्च २०२३ रोजी दुपारी १२.००ते १.०० वाजे पर्यंत राहणार आहे. कार्यक्रमाची लिंक या प्रमाणे आहे. कार्यक्रमाची लिंक ओपन करणे करिता CISCO Webex application play store मधून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावे
Workshop link open केल्यानंत्तर CISCO Webex application च्या एका बॉक्स मध्ये आपले नाव लिहावे व email id टाकावे. तसेच आपनास online feed back form ची लिंक येईल, ती भरणे अनिवार्य आहे. Online feed back form काळजीपुर्वक भरावा. त्यावरिल नावा प्रमाणेच आपले Online प्रमाणपत्र जनरेट होईल.
या कार्यशाळेला बहूसंख्येने आपण सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव जिल्हा परिषद अध्यक्ष मा. दादासाहेब ठाकरे, प्राचार्य, डॉ.सुर्यकांत कान्हेरकर, आणि IQAC समन्वयक प्रा. डॉ. अनंत शिंदे यांनी केले आहे.
0 Comments