Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे समोर उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या

वाशिम: मालेगाव
तालुक्यातील मसला येथील राष्ट्रीय विद्यालय येथे मागील २३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षक कैलास इंगोले यांनी आत्महत्या केल्याने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . नोकरीत कायम करण्यासाठी संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापक हे गेली अनेक दिवसापासून 10 लाख रुपयाची मागणी करून छळ करत असल्याचे शिक्षकाच्या पत्नीने

आरोप करत पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी संस्थाचालक सत्यानंद कांबळे , सिद्धार्थ कांबळे, सचिन अढागळे / मुख्यद्यापक विष्णू कांबळे यांच्यावर , जउळका येथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... शिक्षकाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी चर्चा जनतेत सुरू आहे.

Post a Comment

0 Comments