वाशिम, दि. 06 : वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे 3 मार्च 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी.जी. गवलवाड होते. कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिमखाना उपाध्यक्ष आर.बी.महाजन, स्नेहसंमेलन प्रभारी आर .जी. बिलोलीकर, विभाग प्रमुख श्री.ढोले, श्री.बावणे, श्री.बागडे, श्रीमती मोरे, श्री.खेरडे, श्री.सिंहे, श्री.नागेसह अन्य अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. गवलवाड यांनी स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना भावनात्मक व कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले. श्री.खारोडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व विजेत्यांचे अभिनंदन केले. स्नेहसंमेलनामध्ये रांगोळी, पोस्टर प्रेझेंटेशन, नृत्य, गीतगायन, नाटक आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून त्यांच्यामधील असलेल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन करून मनोरंजन केले.
0 Comments