राम सेना मित्र मंडळाच्या सदस्यांनी वाचवले शेकडो बगड्यांचे प्राण, सर्वत्र कौतुकाचा वादड वाऱ्या सह झालेल्या गारा सारखा अभिनंदनाचा पाऊस.
मंगरूळपिर/ बाळु काळे :- काल शहरात सायंकाळी अचानक गहिवरून आले,भुतो न भविष्य ज्याचा विचार निसर्गातील कोणत्याही प्राणी मात्रा यांनी केला नसेल असा अचानक वादळं वारा गारा सह पावसाने थैमान घातले ज्यात झाडांवर राहनाऱ्या निर्वासितांना यात आपला जीव गमवावा लागला मात्र शहरातील रामसेना मित्र मंडळाच्या काही तरूनांनी या वादळातही अनेक पक्षांना जिवनदान देण्याचे पवित्र काम गारा पडत असतांना केलें ज्यांचे खरच सर्वत्र कोतुक होतं आहे. जीवाची पर्वा न करणाऱ्या यांच्या हिमतीला व धाडसाला पाहून अंगावर शहारे उभे होतील जिल्हाधिकारी साहेब कागदावर वावरणाऱ्या पक्षी प्रेमिन पेक्षा यांचा सन्मान केला तर निश्चितच असे पक्षीप्रेमी समोर येतील
या संसारात आईला मुलं जड ही परिस्थिती असतांना सर्वंच आपला जीव वाचवण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करतात मग अशात पाखरे,प्राणी यांचा कोणीच विचार करत नाही, मात्र सर्व पणाला लावुन अंगावर बोरा पेक्षाही मोठ्या गारा झेलुन जिवाची पर्वा न करता अबोल व मुक्या प्राण्यांना पाण्यात वाहत असतांना गारी ने झोडपल्याने पडत असता जिवनदान देण्याचे ईश्वरीय कार्य या तरूनांनी केले यात नवीन संगत, प्रज्वल काळे, अविनाश खरारे,आरव पांडे, आशीष खरारे, ऋतिक खरारे, हर्षद कोकरे, रोहित गेंद, अंकुश कोटगीर,अक्षय खरारे,यांनी कुठलीच तमा न बाळगता बगळ्यांचे जिव वाचवले हे येथे पक्षी प्रेमी यांच्या करीता एक सबकच म्हणावं, यांच्या कार्याला मानाचा मुजरा
0 Comments