Ticker

6/recent/ticker-posts

जिनिंग प्रेसिंग निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय

मंगरूळपीर  तालुका सहकारी जिनिग प्रेसिंग संचालक पदाच्या निवडणुकीत शेतकरी सहकार पॅनलने १५ पैकी १५ जागी दणदणीत विजय मिळवत विरोधकावर मात करत  एकहाती सत्ता काबीज केली. विरोधी तालुका विकास पॅनलला एकाही जागेवर खातेही उघडता आले नाही. 

शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत रविवारी, २६ मार्चला सकाळी ८ पासून तर दुपारी ४ पर्यंत निवडणूक पार पडली. तर रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी दुय्यम निबंधक कछवे यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी झाली व निवडणूक पार पडली. सहकारी जिनिग प्रेसिंग च्या निवडणुकीत जेष्ठ नेते माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार पॅनल चा एकतर्फी विजय झाला.तर या निडणुकीत तालुका विकास पॅनलला एकही जागेवर खाते उघडता आले नाही. विजयी उमेदवारांमध्ये राजेश बालाराम ढोले, ज्योती ताई मनोज ठाकरे, कमलाबाई चौधरी,  सुरेश राठोड, शिरीष भगत, मधुकर आव्हाळे, देवलाल ठाकरे, बापूराव ठाकरे, धंनजय पाटील, रामदास फुके, सतिष बाहेती, राजेंद्र मिसाळ, दादाराव राऊत, सुभाष राऊत, गोपाल सावके यांना प्रचंड प्रमाणात मते मिळाल्याने कार्यकत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. व गुलाल उधळून विजयी झालेल्या उमेदवारांचा सन्मान करण्यात आला हा विजय तुमचा आमचा सर्वांचा असल्याचे माजी राज्यमंत्री यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments