Ticker

6/recent/ticker-posts

श्री वसंतराव नाईक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अभ्यास सहलचे आयोजन

 
मंगरूळपीर :- स्थानिक  श्री. वसंतराव नाईक कला व श्री. अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर जि.वाशिम येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 28 मार्च 2023 रोजी आदर्श ग्राम येडशी येथे राज्यशास्त्र विभागाअंतर्गत अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बी ए चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 
गावची माहिती त्यामध्ये गावचे सरपंच सन्माननीय सहदेव चक्रनारायण ग्रामसेवक ज्योती पाटणकर मॅडम उपसरपंच जितेंद्र बारड व सर्व ग्रामपंचायत सदस्य व राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी सरपंचांनी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत विषयी माहिती दिली व सरपंचाचे कार्य कोणते हे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले व तसेच ग्रामसेवक मॅडम यांनी पण त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांचे कार्य व काम सांगितले व  राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष करण शेजव उपस्थित होते. राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.पी.आर. तायडे  यांनी आपल्या भाषणामध्ये  विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज गजभार यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार राजनंदनी वसंत पवार हिने  मानले.  व सदर कार्यक्रम राज्यशास्त्र विभाग यांच्यावतीने प्रा.पीअर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.  कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रगीताने झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, पोलीसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती लाभली.

Post a Comment

0 Comments