Ticker

6/recent/ticker-posts

महिला म्हणजेच अष्टपैलु व्यक्तीमत्व : डॉ. रचना पचोरी


वाशिम :   येथील ऍड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयामध्ये जागतीक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व प्रमुख वक्त्या म्हणून आर.ए. कॉलेज मायक्रोबायलॉजी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रचना पचोरी ह्या होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे होते. प्रमुख वक्त्या डॉ. रचना पचोरी ह्यांनी आपल्या भाषणामध्ये महिला सशक्तीकरणाची खरच गरज आहे का?
 महिला सशक्तीकरणाचा चुकीचा अर्थ घेतल्या जातो का? महिला सशक्तीकरणामध्ये शारिरीक आणि मानसिक आरोग्याचे महत्व या मुद्यांवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर महिला म्हणजे अष्टपैलु व्यक्तिमत्व असे प्रतिपादन करुन महिलांना आपली प्रगती करण्यासाठी पहिले प्राधान्य चांगले मानसिक व शारिरीक आरोग्य जपण्याला द्यायला पाहिजे व नेहमी सकारात्मकता ठेवली पाहिजे असे मत व्यक्त केले.

2023 च्या जागतिक महिला दिनाचे डिजिट ऑल इनोव्हेशन ऍण्ड टेक्नोलॉजी फॉर जेंडर इक्वालिटी हे घोषणावाक्य आहे आणि त्या अनुषंगाने प्रा. ललिता दाभाडे ह्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल, यावर मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुशांत चिमणे ह्यांनी जोपर्यंत महिलांकडे बघण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत खर्‍या अर्थाने महिला सशक्तीकरण शक्य नाही असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. भाग्यश्री धुमाळे ह्यांनी केले तर संचालन पुजा वानखडे, प्रास्ताविक अपेक्षा राऊत व आभार प्रदर्शन वर्षा राठोड ह्यांनी केले.
कार्यक्रमाला ऍड. सज्जनसिंग चंदेल, प्रा. संजय इढोळे, डॉ. सागर सोनी व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. राजस्थान शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शिलाताई राठी, उपाध्यक्ष श्यामसुंदरजी मुंदडा, ठाकूरदासजी मालाणी आणि सचिव सुधीरजी राठी ह्यांनी अशा कार्यक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थी ह्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments