मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम आजगाव येथील महिला व गावकरी मंडळी यांनी आजगाव येथील अवैध दारू विक्रेता प्रदिप फुसाराम भोसले, अशोक ठाकरे, बारकु किसन वाहन,हे
आजगाव ता. मंगरुळपीर जि.वाशिम येथील रहवाशी असून
अवैध दारु विक्री करता या दारूमुळे युवा पिढी व्यसनाच्या खाईत व आज पर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही .
करिता कायदेशीर कार्यवाही व्हावी याकरिता मा. ठाणेदार . मा तहसीलदार, मा. दारूबंदी अधिकारी यांना आजगाव येथील महिलांनी निवेदन देऊन तात्काळ दारूबंदी करून संबंधितांवर योग्य कार्यवाही करावी असे निवेदन देण्यात आले आहे.
आम्हीआजगावं येथील कायम रहिवाशी असुन येथे मोठया प्रमाणात अवैध दारुची विक्री केल्या जात असून वरील सर्व बेकायदेशीर पणे दारू विक्री चालू असून . त्यामुळे गावातील नागरीकांना त्याचा नाहक मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत असून कित्येक संसार उघड्यावर आले आहे.
दररोज दारु खरेदीकरण्या करीता गावाबाहेरील नागरीक येतात व गावातील नागरीकां सोबत नाहक दारू पिऊन वादविवाद करुन भांडण करतात.त्यामुळे गावातील शांतता भंग होवुन एखादी अनुचीत घटना घडु शकते या मुळे समस्त नागरीक वरील गैरअर्जदारांना समजाविण्या करीता गेलो असता त्यांनी आम्हालाच आवार्च भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे गावात तणाव होण्याची दाट शक्यत नाकारता येत नाही.तरी गावातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्याचे दृष्टीकोणातुन वरील दारू विक्री करणाऱ्या वर चौकशी करून दंडात्मक कायदेशीर कारवाई करणे जरुरी आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच आपणास नम्र विनंती आहे की आजगाव येथील होत असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी .
निवेदनावर नर्मदाबाई साखरे ,लताबाई नाईक, अनंता बाई डाखोरे, अनुसयाबाई सातपुते ,गारणाबाई धोंगडे लक्ष्मीबाई सातपुते ,सुशिलाबाई नाईक, अनुसयाबाई धोंगडे मंगलाबाई नाईक, कामिनाबाई घनघाव, वंदना गिराटकर, सविता गिरे ,कमलाबाई धोंगडे पार्वती बाई साखरे मंकरनाबाई पांडे वंदना मोरे कल्पना थोरात, बबीता खुळे ,शितलताई सुरतकर दुर्गाबाई थोरात ,सीताबाई ठाकरे सह अनेक महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
0 Comments