Ticker

    Loading......

मा.विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्याहस्ते सायबर पोलीस स्टेशनचे थाटात उद्घाटन

 

सध्याच्या इंटरनेटच्या युगात सोयीसुविधा तात्काळ ऑनलाईन उपलब्ध होत आहेत पण त्याचबरोबर अनेक सायबर धोकेसुद्धा निर्माण झाले आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून त्याद्वारे नागरिकांना गंडा घालण्याचे काम करत आहेत.
     पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे २०१७ पासून सायबर सेल कार्यान्वित असून पोलीस स्टेशन स्तरावर घडणाऱ्या सायबर फसवणुकीच्या तपासात मोलाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंत सर्व तक्रारींवर स्थानिक पोलीस स्टेशन सायबर सेलच्या मदतीने कार्यवाही करत होते, परंतु सायबर गुन्ह्यांची व्याप्ती पाहता महत्वाच्या सायबर गुन्ह्यांचा तपास हा प्रशिक्षित सायबर पोलीस पथकाकडून आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासन अधिसूचना दि.१५.११.२०१६ अन्वये C.I.D. पुणे यांचेकडून दि.२०.०२.२०२३ रोजी C.C.T.N.S. प्रणाली Go Live करून वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन हे कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्याशी झालेल्या ऑनलाईन सायबर फसवणुकीची तक्रार आता थेट सायबर पोलीस स्टेशनाला करता येणार असून त्यामुळे नागरिकांना सुविधा निर्माण झाल्या आहेत.
     मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांनी प्रास्ताविकपर भाषणात सायबर सेलची उत्कृष्ट कामगिरी व सायबर पोलीस स्टेशन स्थापण करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. सायबर सेलमार्फत आतापर्यंत अंदाजे २४ लाख ४० हजार रुपयांचे २३५ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले असून आजच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने ६ लाख रुपये किंमतीचे ४० मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. सायबर पोलीस स्टेशनद्वारे आम्ही नागरिकांच्या होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीला टार्गेट करणार आहे तसेच सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी वाशिम शहरातील आर.ए.कॉलेज व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशिम येथील विद्यार्थी व शिक्षक हजर राहत सायबर पोलीस स्टेशनला भेट दिली.
     यावेळी सायबर गुन्हे व त्यावरील उपाययोजना या विषयावर मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.जयंत नाईकनवरे साहेब यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात आपण ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःला वाचविण्यासाठीच्या उपाययोजना समजावून सांगितल्या. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.
     नागरिकांनी सायबर फसवणूक होऊ नये यासाठी आवश्यक काळजी घेत अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, कुणालाही OTP सांगू नये आणि तरीसुद्धा जर त्यांची सायबर फसवणूक झाल्यास सर्वप्रथम सायबर क्राईम हेल्पलाईन क्र.१९३० वर संपर्क करावा तसेच NCCR पोर्टलवर (https://cybercrime.gov.in/) आपली तक्रार नोंदवावी. आपला मोबाईल हरविला/चोरी गेला तर त्याची तक्रार CEIR पोर्टलवर (https://www.ceir.gov.in/) तक्रार नोंदवावी. काही अडचण आल्यास नागरिकांनी थेट सायबर पोलीस स्टेशन, वाशिम येथे आपली तक्रार नोंदवावी.
     सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, वाशिम आणि पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments