संविधानिक मूल्य जोपासणे हे प्रत्येकाचे कर्तव्य : प्राचार्य डॉ.सुभाष गवई
मंगरूळपीर :- स्थानिक श्री.वसंतराव नाईक कला व श्री.अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ.राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार संविधान प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारअर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तथा नवनिर्वाचित सिनेट सदस्य प्राचार्य डॉ.सुभाष गवई श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. एस.ए.राठोड होते. सर्वप्रथम नवनिर्वाचित सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पी.आर. तायडे यांनी केले. त्यांनी संविधान प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची रूपरेषा व या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना कोणकोणते फायदे आहेत आणि स्पर्धा परीक्षा करिता हा अभ्यासक्रम किती महत्वपूर्ण आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगितली. या अभ्यासक्रमाचे उद्घाटक संविधानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांनी आपल्या उद्घाटनकीय भाषणातून सविधान प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्यांनी मार्गदर्शन करताना, संविधानिक मूल्य प्रत्येकाने जोपासले पाहिजे. आणि आपले अधिकार ते दुसऱ्याचे कर्तव्य असते. इतरांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करणे म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय निर्माण होऊ शकतो. आपलं अस्तित्व टिकवायचे असेल तर संविधान वाचवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आपले अस्तित्व अबाधित ठेवून दुसऱ्याच्या अस्तित्वावर घाला घालू नये. डॉ.बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा मार्ग दिला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आणि भारताचे संविधान हा माझा प्राण असल्याचे त्यांनी व्यक्त केले. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस.ए.राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रत्येकानी संविधान समजून घेतले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.सायली भगत बी.कॉम. भाग एक हिने केले. तर आभार श्री.पंकज गजभार यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
0 Comments