कारंजा
दि. 15/03/2023
पोस्टे कारंजा शहर येथे दि. 13/03/2023 रोजी फिर्यादी प्रविणकुमार खुशालचंद गुप्ता व्यवसाय असिस्टेंन्ट मॅनेजर ब्ल्यु डार्ट कंपनी (कुरिअर सेवा) रा. काटोल रोड नागपुर यांनी पोस्टे येवुण तक्रार दिली की, त्याचे कारंजा येथील ब्ल्यु डार्ट कंपनी (कुरिअर सेवा) चे कारंजा येथील मैनेजर शुभम सुभाष कांबळे रा. मुर्तीजापुर यांनी फिर्यादी यांना फोन करुण माहीती दिली की, ऑफीस मधुन कोनीतरी अज्ञात चोरट्याने दि. 11/03/2023 चे रात्री दरम्याण ऑफीस शटर के कुलुप कापुण आत प्रवेश करून ऑफीस मधील एकुण 13 पार्सल 32,394/- रु चे तसेच ऑफीस चा जुना वापरता डेल कंपनीता प टॉप की 40,000/- रु व लोखंडी अलमारीचा मागील पत्रा कापुन नगदी 2,48,753/- रु असा एकूण 3.21.147/- रु चा माल कोनीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा रिपोर्ट वरुण गुन्हा दाखल करुण तपासात घेतला.
तपासा दरम्यान सदर कुरिअर सेवा ऑफीस मधील कर्मचारी यांचेवर संशय आल्याने त्यांना विश्वासात घेवुव त्यांचे वेगवेगळे जबाब नोंदविले असता सदर कुरिअर ऑफीस मधील मॅनेजर शुभम सुभाष कांबळे रा. मुर्तीजापुर याने त्याचा मुर्तीजापुर येथील मित्र ऋषिकेश शंकरराव हीवराळे याचे मदतीने सदरची चोरी केल्याचे कबुली दिल्यावरुन त्यांना अटक करुण त्यांचे ताब्यातून नगदी 1,70,000/-, 13 पार्सल पैकी 02 पार्सल की. 2700/-, तसेच लोखंडी अलमारी कापण्याकरिता वापरलेली ग्राईंडर मशीन की. 2000/- असा एकुण 1,74,700/- रु चा माल हस्तगत करण्यात आला अमुण गुन्हयात चोरी गेलेला इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात येते.
सदरची कार्यावाही ही मा. पोलीस निरिक्षक श्री आधारसिंग सोनोने साहेब पोस्टे कारंजा शहर यांची मार्गदर्शनात पोउपनि बि.सी. रेघीवाले नापोका उमेशकुमार बिबेकर ब.नं. 1017 पोका अमित भगत ब.न. 311, नितीन पाटील ब.नं. 338. गजानन शिंदे ब.न. 1409, चापोहेका बालू ढगे ब.नं. 102 यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि बि.सी. रेघीवाले करीत आहेत.
0 Comments