Ticker

6/recent/ticker-posts

मराठी भाषा संवर्धन दिननिमित्त मनसेचे स्वाक्षरी अभियान


वाशिम - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्क नेते विठ्ठल लोखंडकर यांच्या मार्गदर्शनात २७ फेब्रुवारी रोजी पक्ष कार्यालयात स्वाक्षरी अभियान घेवून कवी कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा संवर्धन दिन साजरा करण्यात आला.
    प्रारंभी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मनसे पदाधिकारी, मनसे सैनिक व नागरीकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला पक्षाचे शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले, प्रतिक कांबळे, मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन कुटे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, रिसोड तालुका उपाध्यक्ष संतोष पोळ, शहराध्यक्ष विजय जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष वैभव वानखेडे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष रघुनाथ खूपसे, महिला सेना संघटक वंदना अक्कर, परसराम दंडे, लक्ष्मण राऊत, मनोज इंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments