वाशिम पोलीस दलात चालक पोलीस शिपाई पदासाठीच्या १४ जागांसाठी भरती प्रक्रियेस दि.०२ जानेवारी, २०२३ पासून सुरुवात झाली होती. चालक पोलीस शिपाई पदाच्या १४ जागांसाठी १०७८ उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. सदर भरती प्रक्रीयेमध्ये मैदानी चाचणीत ५०% गुण मिळवून पुढील प्रकियेसाठी गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या एकूण १५८ उमेदवारांची दि.१० जानेवारी, २०२३ रोजीपासून वाहन कौशल्य चाचणी पार पडली होती.
मैदानी चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये गुणानुक्रमे उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दि.२६.०३.२०२३ रोजी सकाळी ०८.४५ वा. ते १०.१५ वा. दरम्यान आर.ए.महाविद्यालय, वाशिम येथे पार पडली. चालक पोलीस शिपाई पदाकरिताच्या लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या एकूण १३४ उमेदवारांपैकी ११५ पुरुष उमेदवार व ०६ महिला उमेदवार अशा एकूण १२१ उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता हजर राहून परीक्षा दिली. परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व हॅण्डहेल्ड व्हिडीओ कॅमेऱ्यांच्या निगराणीत सदर लेखी परीक्षा यशस्वीपणे शांततेत पार पडली.
चालक पोलीस शिपाई पदासाठी पार पडलेल्या लेखी परीक्षेची मॉडेल उत्तरपत्रिका व प्राथमिक गुणतालिका यादी www.washimpolice.gov.in/recruitment या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमदेवारांनी कसल्याही प्रकारच्या आमिषांना व प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
0 Comments