Ticker

6/recent/ticker-posts

बळीराजांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला! अवकाळीचा जिल्ह्यात कहर; उभी रब्बी पिके झाली जमीन दोस्त

वर्ल्ड स्पीड न्यूज वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी

राज्यात सगळीकडे होळी साजरी होत असताना बळीराजाच्या स्वप्नाचा चुराडा निसर्गाने केला घात बळीराजानं करावं तरी काय? कधी पिकाला भाव कमी तर कधी अवकाळी पाऊस. सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यासह मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 वाशिम जिल्ह्यात मंगरूळपीर तालुक्यासह मध्यरात्री तसेच सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, विदर्भात पुढील दोन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता कायम आहे. अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. आधीच सोयाबीनला भाव नाही मुला मुलींचे लग्न, कर्ज कसे भरावे, इंग्रजी शाळांची फी , अशा आसमानी संकटाला तोंड देत बळीराजाच्या स्वप्नाचा चुराडा झाला हात तोंडाशी आलेला घास बळीराजांनी उराशी बाळगलेले स्वप्न अवकाळी पावसाने धुळीस मिसळवले नोकर वर्गाचं काय त्यांचा पगार तर चालूच आहे. आमच्या पाचवीला कायमचं दुःख लिहिलेलं कधी पुसणार देशातील सत्ता संघर्षामुळे बळीराजाला कोण वाली असा सवाल आता जनसामान्यात बोलला जात आहे.
काही भागात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या . येत्या बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहरासह जिल्ह्यात गडगडाटासह  काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी  स्वरूपाचा पाऊस झाला.
दरम्यान, पावसाचा फळबागांवरही परिणाम झाला असून काही भागात आंब्याचा मोहर गळाला आहे. मोसंबी, डाळिंब फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या हरभरा, गहू रब्बी ज्वारी,  भाजीपाला पिकांची आणि टरबूज, खरबुजाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. 

Post a Comment

0 Comments