जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय डेमो हाऊसचे भुमिपूजन
वाशिम दिनांक 3
पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या डेमो हाऊसचे भुमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या परिसरात दि.2 माच रोजी करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासनामार्फत घरकुलाची सुविधा देण्यात येते. यामध्ये ग्रामीण लाभार्थ्यांना जिल्हा स्तरावर घरकुल डिझाइन टायपॉलॉजीच्या योग्य आकलनासाठी प्रात्यक्षिक घरे अर्थात डेमो हाऊस बांधण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत डेमो हाऊस बांधण्यात येणार आहे. हे डेमो हाऊस म्हणजे एक आदर्श असे घरकुल असुन हे घरकुल पाहुन लोकांना त्यानुसार घरकुल बांधण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळणार आहे. या डेमो हाऊस मध्ये बांधकामा करीता मार्गदर्शन मिळणार आहे तसेय याचा उपयोग महिला बचत गटाच्या साहित्य प्रदर्शनी व विक्री करीता होणार आहे.डेमो हाऊसच्या भुमिपूजन प्रसंगी अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैभव सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद इंगोले, जि. प. सदस्य डॉ. शाम गाभणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, मुख्य वित्त व लेखाधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सपकाळे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक गजानन वेले, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे यांची उपस्थिती होती.
0 Comments