Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथील राजस्थानी चंग मंडळाने शेगाव नगरीत पारंपारिक गाण्यासह रंगाची केली उधळण


महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत होळीचा सण साजरा केला जातो. होलिकादहन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी गुलाल, अबीर आणि विविध रंगाची उधळण करून धुळवड साजरी केली जाते. महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात हा सण  अधिक मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भात याला शिमगा असं म्हणतात. खास विदर्भातील शिमग्यासाठी विविध जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात विशेष म्हणजे राजस्थानी समाज या उत्सवाला एक महिन्या आधीपासूनच सुरुवात करतात वेगवेगळ्या गाण्यांची व रंगांची उधळण करतात गेली कित्येक वर्षापासून हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो आवर्जुन यासाठी 
मंगरूळपीर येथील राजस्थानी चंग मंडळ   अध्यात्मिक सामाजिक बांधिलकी जोपासून  या समाजाच्या माध्यमातून विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव निवासी समर्थ सद्गुरु  श्री गजानन महाराजांच्या नगरीत मोठ्या हर्षवल्यासात हरीष बियाणी, पुरुषोत्तम चितलागे ,
उज्वल बंग ,विजय मुंदडा, लाला शर्मा, कृष्णा भुतडा, रवी बंग, गजानन असावा, संजय राठी,
रोहित भुतडा ,मनीष बंग ,नंदलाल जखोटीया ,अनिल बंग ,आंनद बंग, जय बियाणी , पवन सारडा ,विष्णू भन्साळी, प्रणव जोशी,अनिल भन्साळी ,सागर करवा, बबलू बाहेती, लाला बाहेती, अरुण लोहिया , रितेश काबरा, विजय बाहेती, निरज बजाज,  मुकेश राठी ,इत्यादी राजस्थानी बांधव दरवर्षी विदर्भात आपली छाप सोडत असतात

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो. होळी व धुलिवंदन च्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments