अनंतराव देशमुख, _पाटणीत स्वपक्षातुन दावेदारी.?
वाशीम खबर संपादकीय :- अवघ्या दहा अकरा महिण्यावर होऊ घातलेल्या देशाच्या लोकसभा निवडणुकां यात यवतमाळ -वाशीम लोकसभा मतदारसंघ हा आता पळवा-पळविच्या राजकारणाला कंटाळून नवीनच चेहरा देण्याच्या मणसुब्यात दिसतं आहे,असे जर झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचारसरणीशी नाड जुळवुन असलेले संयमी व रूबाबदार विकास पुरूष सुभाषराव ठाकरे माजी मंत्री हे नविन चेहरा म्हणुन सरशी ठरत लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या इच्छांना पुर्ण खरे ठरतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
नव्यानेच विद्यमान खासदार भावना गवळी यांना विद्यमान शासनाने चंद्रपुर सह यवतमाळ -वाशीम लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखाची धुरा दिल्याने येत्या होऊ घातलेल्या सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार भावना गवळी यांना "अल्प विराम की पुर्ण विराम" ?..हा चर्चेचा विषय जर असे झाले तर भावना गवळी यांना राज्यसभेवर थेट "पदोन्नती" हा सुद्धा सुर मतदार संघात ऐकायला मिळत आहे.१९८९-९० नंतर स्थानिक खासदार म्हणुन पुंडलिक गवळी यांनी तेरा चौदा महिण्याचे सरकार मध्ये काम केलें तद्नंतरच त्यांनी त्यांचे जागी सत्तासंघर्ष नंतर आपल्या कन्नेस म्हणजेस भावना गवळी यांना राजकारणाच्या आखाड्यात उतरवले ते शिवसैनिक म्हणुन आजतागायत विद्यमान खासदार म्हणुन कायमच.मात्र हा ईतीहास आता पुसण्यासाठी भाजपा कंबर कसुन आहे. कारण असे की देशाचे विकास पुरूष रस्ता महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी यांचे कडे यवतमाळ -वाशीम मतदार संघाची पक्ष बांधणीसाठी दिलेली जबाबदारी ही विसरता कामा नये! तर एकीकडे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी कारंजा - मानोरा मतदार संघाची जबाबदारी ही दिलेल्या शब्दाला जागत माजी मंत्री बाबासाहेब धाबेकरांचे सुपुत्र तरूण तडफदार नेते सुनील धाबेकर करीता सोडणार असल्याचे चिन्हं स्पष्ट होतांना दिसत आहे. तर मागिल चाळीस वर्षापासुन ज्या कॉंग्रेस पक्षातुन लोकनेता पर्यंत "हाताचा पंजा" धरून मजल मारली असे जिल्ह्यातील जेष्ठ नेते मा अनंतराव देशमुख यांनी ऐन वेळेवर "कमळाचे देठ" धरण्याचे योजिले ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पुर्वी व सतत लोकसभेच्या यवतमाळ -वाशीम उमेदवारी वर डोळा ठेऊन तर एकदा पराभवाचा सामना पत्करावा लागला असे मनोहरराव नाईक यांनी सुद्धा "हाताच्या घडळ्याला" सोडुन फुलाबाई? च्या नादाला लागण्याच ठरवलंय, त्यामुळे नेमकी दावेदारी कुणाची हा राजकारण्यांना पडलेला न सोडवता येनारा प्रश्न. मात्र येत्या काळात तीच जुनी १९८९-९०ची सामाजिक व ऐक्क्याची व्रज्र मुठ माजी मंत्री सुभाषराव ठाकरे साहेब यांनी जुन्या शिलेदारांना घेऊन बांधन्यास सुरूवात केल्यास,आणी ती परिस्थिती निर्माण झाल्यास, भारतीय जनता पक्षाचे उमेदवारच काय तर स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जर यांनी या लोकसभा मतदारसंघ मध्ये ठिय्या मांडला तरी सुभाषराव ठाकरे साहेब यांना पराभुत करू शकणार नाही व खासदारकी पासुन कुणी वंचीत ठेऊ शकणार नाही.हे सुर्य प्रकाशा इतके सत्य. पण राजकीय वा सामाजिक वा ईतर समाजातील कर्तुत्ववान व गावागावांतील प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन चालण्याची प्रव्रुत्तीचा विसर राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना झालेला पहावयास मिळत आहे, त्यामुळे माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांचे खासदारकीत अडथळाच नव्हे तर स्वप्न सुध्दा भंग होण्याचे संकेत देत आहे.
जिल्ह्यातील दोन बलाढ्य नेत्या पैकी एकाने या आधी खासदारकी लढवुन आपले आजमावलेत तर सरते शेवटी कमळाबाईचा देठ पकडला... मात्र दुसरा बलाढ्य नेता अजुनही पडतीच्या काळात देशाचे माजी क्रुषिमंत्री- संरक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारसरणीशी एकणीष्ठ असल्याचे दिसुन येत आहे, त्यामुळे देशाच्या राजकारणात या नेत्याला सेवा करण्याची व देशसेवा करण्याची संधी मीळु शकते.राज्या सह वाशीम जिल्ह्यात एवढं गढुळ राजकारण पण सर्वांना सोबत घेण्याचा चांगुलपणा व जिल्हा परिषद व इतरही संस्था आपल्या पक्षाकडे ठेवण्यात यश मिळवणारे स्वच्छ प्रतिभावान, जनतेप्रती पारदर्शी विकासात्मक द्रुष्टीकोण अंगीकारलेला सुभाषराव ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अंतर्गत अथवा "मविआ" अंतर्गत लोकसभा विषय गणल्या गेला तर नवखा व विकास पुरूष म्हणून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे हाच चेहरा. खासदारकी करिता मतदारांच्या मनात "भारतीय जनता पक्ष विरोधात सरशी व हुकमी ऐक्का ठरू शकते". त्यामुळे येत्या खासदारकी करिता सुभाषराव ठाकरे साहेब हे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शब्दाला महत्त्व देतात की "दुरूनच डोंगर साजरा" ही भुमीका वठवतात या कडे यवतमाळ _वाशीम लोकसभेच्या मतदारांचे लक्ष लागुन आहे.
0 Comments