Ticker

6/recent/ticker-posts

कडकडाटासह गारपिटीचा तडाखा, चेहेल येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

    शेतात पडलेल्या गारा पाहून       शेतकऱ्याची छाती दडपली

मंगरूळपीर तालुक्यात वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह गारपिटीचा तडाखा, उन्हाळी पीक भूईसपाट  बळीराजा अडचणीत चेहेल येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान सरकार मायबाप नुकसान देईल का रब्बी पिकांचे नुकसान 
मुख्यमंत्री साहेब आम्ही पेरणी केली म्हणजे काय गुन्हा केला छातीला माती लावून जमिनीत रक्ताचं पाणी करतो आणि आमच्या नशिबात काय 

मंगरूळपीर तालुक्यातील जवळच असलेले चेहेल येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गहू हरभरा कांदा  मुंग व टरबुजाची लागली वाट शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न चेहेल येथील शेतकऱ्यांना पडला आहे. आपल्या प्रपंचाचा गाळा सुरळीत चालण्यासाठी शेतात घरातील सोन्याने विकून खाजगी सावकाराचे कर्ज काढून शेतीला मोठ्या प्रमाणात लाव लागवड करावी लागते रात्रंदिवस मेहनत करून हातात तोंडाशी आलेला घास धुवाधार गारपिटीमुळे उभ्या पिकाचा धिंगाणा केला आहे. उराशी बाळगलेले स्वप्नांची लागली वाट चेहेल धानोरा रईत सवासणी या परिसरातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी भांबावून गेला होता. गार लिंबाच्या आकाराची असल्यामुळे  टरबुजाच्या वेळी तुटून  पडल्या आहे मोठ्या टरबुजांना मार लागल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा मुंग गहू आणि हरभरा दरवर्षीच निसर्गाचा फटका सहन करावा लागत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या वेळी शेतात व रस्त्यावर गारांचा असा खच पडला होता. त्याचे काही क्षणचित्र
गारपिटीने टरबुजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी , महिंद्रा चौधरी, चेतन चौधरी, किशोर चौधरी, ओम चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, वैभव चौधरी ,गजानन चौधरी, सुभाष चौधरी 
गारपिटीने संत्र्याचे झालेले नुकसान शेतकरी अनिकेत दिगंबर चौधरी, शुभम गजानन चौधरी, शिरूर महादेव चौधरी, हरीश विठ्ठल चौधरी इत्यादीचे मोठ्या प्रमाणात संत्र्याचे झालेले नुकसान
कांद्याचे नुकसान  गोपाल चौधरी गंगाराम चौधरी परिसरातील शेतकऱ्यांचे
गारपिटीने गव्हाचे नुकसान शेषराव चौधरी गंगाराम चौधरी व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्याबी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देण्यास आल्यास तीव्र आंदोलन व अमरण उपोषण करू असे प्रतिपादन अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास मा. संघटक   सुधाकर चौधरी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments